🕒 1 min read
मुंबई : श्रीलंकेचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. रविवारी २३ मे रोजी दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा ३३ धावानी पराभव करत मालिकेची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात बांग्लादेशचा सलामीवीर तमीम इक्बालने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एका विक्रमाला गवसणी घातली.
सलामीवीर म्हणून तमीम इक्बालने या सामन्यात १४००० धावांचा टप्पा ओलांडला. सलामीवीर फलंदाज म्हणून जागतीक क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तर अशी कामगिरी करणारा तो जगातील १०वा फलंदाज ठरला आहे. सलामीवीर म्हणून तमीम इक्बालने १४,०११ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तमीमने ५२ धावा करताच या विक्रमाला गवसणी घातली. या खेळीदरम्यान तमीमने ६ चौकार आणि १ षटकार लगावला होता.
Tamim Iqbal is only the 10th opener with 14,000 international runs ???? pic.twitter.com/rPn56iqdlg
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 23, 2021
सलामीवीर म्हणून जागतीक क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या तिनही प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसुर्याने केला आहे. जयसुर्याने तब्बल १९२९८ धावा केल्या आहेत. जयसुर्यानंतर या क्रमवारीत दुसरा क्रमांक हा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा येतो. गेलने १८८३४ धावा केल्या आहेत. यानंतर दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने १६९५० धावा फटकावल्या आहेत. या यादीत भारताकडून सचिन तेंडुलकर १५३३५ आणि विरेंद्र सेहवाग १६११९ यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
- पदोन्नती आरक्षण : सरकारमधील वाद टोकाला, कॉंग्रेस मंत्र्याने दिला थेट ‘हा’ इशारा
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
