Share

‘५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाचा अभाव’

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना हा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने प्रत्येकाला स्वाभिमान आहे. हे वातावरण गेल्या वेळच्या सरकारमध्ये होतं का याबद्दल शंका आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे’ असं पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आता याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावरून  संजय राऊतांन टोला लगावला आहे. ‘शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा असतील.पण महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकलं तर मुख्यमंत्री पदासाठी ‘वाटा’ कि ‘घाटा’ असा प्रश्न निर्माण होईल.

कारण, आताच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून पॅड बांधून आहेत. मुख्यमंत्री पदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही.त्यामुळे ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील,या संजय राऊतांच्या वक्तव्यातून आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो,असा पलटवार प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!