मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या कारकिर्दीतील अंधार संपता संपत नाहीये . भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी प्रदीर्घ काळानंतर कुलदीप यादवचे नाव कसोटी संघात आले. मात्र आता मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतरच कुलदीपला कोणतीही चूक नसताना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवला संघातून वगळले आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेत अक्षर पटेलचा (akshar patel) बॅकअप म्हणून कुलदीप यादवची (kuldeep yadav) निवड झाली नसली तरी संघ व्यवस्थापनाचे असे मत आहे की तीन डावखुऱ्या फिरकीपटूंची संघाला गरज नाही, रवींद्र जडेजा (ravindra jadeja) देखील या मालिकेचा एक भाग आहे. याशिवाय १८ सदस्यीय संघात आर अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जयंत यादव हे आणखी दोन फिरकीपटू आहेत. अशा परिस्थितीत आता अक्षर पटेलच्या पुनरागमनानंतर कुलदीप यादवचा पत्ता भारतीय कसोटी संघातून काही काळासाठी कापला गेला आहे.
कुलदीप यादवची टीम इंडियात येण्याची आणि बाहेर होण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणार्या कुलदीप यादवचे अशी परिस्थिती भारतीय क्रिकेट रसिकांना पाहवत नाहीये. कुलदीप यादवने १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या मालिकेत त्याला पुनरागमनाची संधी मिळेल असे वाटत असताना त्याला एकही सामना न खेळवता संघ व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गौतम गंभीरने अश्विनची तुलना केली ‘या’ महान भारतीय दिग्गजाशी, म्हणाला…
- ‘झुंड’चं कौतुक करत असताना ‘पावनखिंड’ विषय काय म्हणाला जितेंद्र जोशी?
- “तो महान नव्हता” गावस्करांच्या वॉर्न विषयी टिप्पणीवर चाहते संतापले
- Breaking News : नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजाने केला वॉर्नरला स्लेज करायचा प्रयत्न मात्र वॉर्नरने केले ‘असे’ काही ; व्हिडीओ होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

