मुंबई : अभिनेता जितेंद्र जोशी याने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याने या चित्रपटाचे भरभरून कौतुक देखील केले. चित्रपट पाहिल्यानंतर तीन दिवसांनी जितेंद्रने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवा’, असं जितेंद्रने या लाईव्हमध्ये म्हटलं आहे. ‘झुंड’, ‘पावनखिंड’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ या तीन चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळतेय. जितेंद्र त्याच्या लाईव्हमध्ये ‘झुंड’चं कौतुक करत असतानाच एका नेटकऱ्याने त्याला पावनखिंडविषयी प्रश्न विचारला.
‘तू पावनखिंड पाहिलास का’?
असा प्रश्न जितेंद्रला विचारला असता, तो म्हणाला, ‘पावनखिंड मला पहायचा आहे. मी गेल्या तीन वर्षांत पहिला जो सिनेमा जो थिएटरमध्ये पाहिलाय, तो म्हणजे झुंड. पावनखिंड पाहण्यासाठी परवा गेलो तर हाऊसफुल होता. मला सिनेमाची तिकिटं मिळाली नाहीत. या इन्स्टा लाईव्हमध्ये जितेंद्रने नंतर नागराज यांनासुद्धा सहभागी करून घेतलं. ‘असा चित्रपट बनवून तू आमच्यावर उपकार करतोय. हा चित्रपट बनवताना पण तुला किती त्रास झाला, तुझं सेट पाडलं, हे सगळं मी जवळून पाहिलंय. पण चांगलं काम करत तू इथपर्यंत आला आहेत. आज मी तुझा सिनेमा पाहून तीन दिवस झाले, पण तसूभरही तो माझ्या मनातलं हलला नाही,’ अशा शब्दांत त्याने नागराज मंजुळेंचं कौतुक केलं. ‘झुंड’बद्दल एक शब्द काय बोलशील असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. त्यावर जितेंद्र म्हणाल “आरसा’. नागराजचा हा चित्रपट तुम्हाला आरसा दाखवतो, असं त्याने म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

