Share

“तो महान नव्हता” गावस्करांच्या वॉर्न विषयी टिप्पणीवर चाहते संतापले

Published On: 

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या अकाली निधनाने संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. सगळीकडून वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी शोक व्यक्त केला आहे. गावसकर यांनी वॉर्नच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक केले, तथापि, ऑस्ट्रेलियन हा सर्वकाळातील महान स्पिनर नाही असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने क्रिकेट रसिक संतापले आहेत.

शेन वॉर्नच्या (shane warne) निधनानंतर सुनील गावस्कर (sunil gavaskar) एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की , “माझ्यासाठी, भारतीय फिरकीपटू आणि मुथय्या मुरलीधरन हे वॉर्नपेक्षा नक्कीच चांगले होते. कारण वॉर्नचा भारताविरुद्धचा विक्रम पाहा. भारताविरुद्ध तो खूपच सामान्य होता,कारण त्याला भारतीय खेळाडूंविरुद्ध फारसे यश मिळाले नाही, जे फिरकी गोलंदाजी चांगले खेळतात. मला वाटत नाही की मी त्याला महान म्हणेन. मला वाटतं, मुथय्या मुरलीधरनला भारताविरुद्ध मिळालेल्या यशाने तो माझ्या पुस्तकात क्रमवारीत वर जाईल.” गावस्करांचे मत क्रिकेट रसिकांना पटले नाही.


https://twitter.com/sidbarjatya/status/1499996726622494722?s=20&t=q_bK-8h4HHpHxATlSthLog

सुनील गावस्कर यांनी शेन वॉर्नला श्रद्धांजली देत पुढे सांगितले, “तो नेहमी संपूर्णपणे आयुष्य जगू पाहत होता, जसे ते म्हणतात तसे किंग साइज आणि त्याने ते केले आणि कदाचित तो अशा पद्धतीने जीवन जगला म्हणून कदाचित त्याचे हृदय ते स्वीकारू शकले नाही आणि त्याचे इतक्या लवकर निधन झाले.” गावस्करांनी केलेल्या वॉर्नला ‘महान न समजने’ वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच चाहते गावस्करांच्या खोचक शैलीवरही संतापलेले दिसले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!