Share

गौतम गंभीरने अश्विनची तुलना केली ‘या’ महान भारतीय दिग्गजाशी, म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने फिरकी गोलंदाज आर अश्विनबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. गंभीरने अश्विनची तुलना महान अष्टपैलू कपिल देव यांच्याशी केली आहे. गंभीरच्या म्हणण्यानुसार अश्विन अष्टपैलू म्हणून कपिल देव सारखाच आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरला प्रश्न विचारण्यात आल की, कपिल देवनंतर आश्विन दुसरा यशस्वी अष्टपैलू आहे का? त्यावर गंभीर म्हणाला की, तो दुसरा नाही तर जवळजवळ त्यांच्या बरोबरीतच आहे. कारण त्याचा प्रभाव कपिल देव एवढाच आहे. त्याने ५ कसोटी शतकही केले आहेत.

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कपिल देवला मागे टाकले आहे. त्याने हा कारनामा श्रीलनकेविरुद्धच्या मोहाली येथील सामन्यात हा विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतल्या. तर आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ४३६ विकेट घेतल्या आहेत. कपिल देवच्या नावावर ४३४ विकेट्स आहेत.

अश्विनने आतापर्यंत ८५ कसोटी सामन्यात २७.१४ च्या सरासरीने २९०५ धावा केल्या आहेत. तर कपिल देव यांनी १३१ सामन्यात ३१.०५ च्या सरासरीने ५२४८ धावा केल्या आहेत. ज्यात ८ शतकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!