मुंबई : २३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना ७ मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावली. तद्पश्चात आता विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले, तिथे जवळपास तासभर चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर मलिक यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि तिथे जवळपास आठ तासांच्या चौकशीनानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. ज्या दिवशी मलिकांना ईडीने अटक केली त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.
दरम्यान, मनी लॉन्डरिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.
महत्वाच्या बातम्या :
- “…तर मला सभागृहातच फाशी द्या”, रवी राणांचे आव्हान
- वाझे तयार कराल तर तुमची अवस्था देशमुखांसारखी होईल- रवी राणा
- पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजाने केला वॉर्नरला स्लेज करायचा प्रयत्न मात्र वॉर्नरने केले ‘असे’ काही ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- “हे सरकार २५ वर्षे टिकणार आहे म्हणे”, ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला
- आलिया की दीपिका कोण आहे बेस्ट? काय उत्तर दिलं संजय लीला भन्साळींनी ..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

