Share

पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजाने केला वॉर्नरला स्लेज करायचा प्रयत्न मात्र वॉर्नरने केले ‘असे’ काही ; व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

मुंबई: ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्याच्या घडीला क्रिकेट जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. तो मैदानावर कोणत्याही परिस्थितीत शांत असतो. मात्र एक काळ असा होता जेव्हा तो आक्रमक असायचा आणि विरोधी संघासोबत मैदानावर लढण्यासाठी तयार असायचा. या गोष्टीची आठवण यासाठी कारण रावळपिंडी येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या तरुण गोलंदाज नसीम शाहकडे पाहून तो हसला.

डेव्हिड वॉर्नरला (david warner) पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीचा आनंद मिळतो कारण त्याने त्यांच्याविरुद्ध कसोटीत नाबाद त्रिशतक झळकावले होते आणि त्याची कसोटी सरासरी १०० पेक्षा जास्त आहे. सुरुवातीचे दोन दिवस सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांशी सक्रिय संवाद साधणारा वॉर्नर हातात बॅट घेऊन चाहत्यांसाठी थक्क करणारा ठरला. त्याची थोडी मजेशीर चर्चा गोलंदाज शाहीन शाह (shaheen shah afridi) सोबतही झाली. मात्र नसीम शाह (naseem shah) सोबत असे झाले नाही.

झाले असे की, नसीमने शॉर्ट बॉल टाकत वॉर्नरला चकित केले. सोबतच तो बराच वेळ वॉर्नरच्या नजरेला नजर देत होता. त्याने वॉर्नरला स्लेज करायचाही प्रयत्न केला. मात्र डेव्हिड वॉर्नर या तरुण गोलंदाजाला बघून केवळ हसला. क्रिकेट चाहत्यांना मात्र या क्षणाला जुना वॉर्नर आठवला. भूतकाळातील वॉर्नरने एका तरुण गोलंदाजने त्याच्याकडे असे बघणे मुळीच सहन केले नसते आणि मैदानावर नक्कीच नसीमला जशाच तसे उत्तरही दिले असते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!