Share

कुलदीप आणि सिराजने केली अंपायरची नक्कल ; व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: T20 फॉरमॅटमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच मनोरंजनात्मक गोष्टी घडत असतात. स्पर्धेत मारले जाणारे मोठे सिक्सर, मैदानावरील प्रेक्षकांचा सहभाग यामुळे टी-२० क्रिकेट एक संपूर्ण मनोरंजनाचे पॅकेज बनले आहे. विशेषत: जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मायदेशात खेळतो. तेव्हा उत्साह आणखी एका पातळीवर जातो. धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20I दरम्यान अशीच एक गमतीशीर घटना घडली जेव्हा कुलदीप आणि सिराज जे डगआऊटवरून टीम हडलकडे जात होते, ते अंपायरच्या मार्गात आले आणि मागे उभे राहून अंपायरने निर्णय देण्यापूर्वी त्यांनी नक्कल करत आऊट असे चिन्ह दिले.

झाले असे कि १० व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूदरम्यान, चरिथ असलंकाला (Charith Asalanka) एलबीडब्ल्यू देण्यात आला कारण चेंडू स्टंपच्या अगदी समोर पॅडवर आदळला होता. फलंदाज रिव्ह्यूसाठी जात असताना अंपायरने त्याला बाद ठरवले. याच काळात सिराज (mohmmad siraj) आणि कुलदीप (kuldeep yadav) यांनी अंपायर मदनगोपाल यांची नक्कल केली. त्यांनी निर्णयाच्या आधीच हात दाखवत आनंद साजरा केला. त्यांचा तो व्हिडीओ मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. श्रीलंकेला टी २० सामन्यात एकही सामना जिंकता आला नाही ज्यामुळे भारताने क्लीन स्वीप केले आहे. भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला ६ गडी राखत पराभूत केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!