🕒 1 min read
मुंबई : कमाल आर खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अनेक इंडस्ट्रीतील लोकांवर केआरके टीका करतो. काही दिवसापूर्वी त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत सलमानच्या राधे सिनेमाविषयी टिका केली होती. या प्रकरणात त्याला कोर्टाने सलमानविरुद्ध टिका करण्यापासुन रोखण्यात आले होते. मात्र तरी देखील त्याचे असे वागणे थांबले नाही. सध्या तो एका न अनेक कलाकारांवर हल्लाबोल करत आहे. आता केआरकेने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1429664799139454979?s=20
केआरकेने अक्षयच्या चित्रपटाबाबत भाष्य केले आहे. ट्विट शेअर करत त्याने लिहिले की, ‘माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, ओटीटी सूर्यवंशीला फक्त ५० कोटी रुपये ऑफर करत आहेतं. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी होतं. म्हणजे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत. वाईट झालं. या मागचे कारण आहे त्याच्या आधीचे चित्रपट काही खास चालले नाही’, असे म्हणत त्याने अक्षयवर निशाणा साधत त्याच्या आगामी चित्रपटाबाबत टीका केली आहे.
दरम्यान, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. याआधी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चर्चा सुरु होती. यावर अक्षयने खुद्द या चर्चेचे खंडण करत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. तसेच वेळ आली की प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात येईल असेही तो म्हणाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
