Share

‘कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही’ ; भरत जाधवने केले मदतीचे आवाहन

Published On: 

कोकण : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आहे. कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीत तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोकणी माणसाला मदतीचा हात द्या अशी विनंती प्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधव यांनी केली आहे.

भरत जाधवने आपल्या अधिकृत इंस्टग्रामवरून एक पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केलं आहे. ही पोस्ट शेअर करत भरत जाधव यांनी लिहिले, ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या. या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत.

https://www.instagram.com/p/CRqc5mDjB1D/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून, कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रातल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवत असून, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!