🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील नव्या पक्ष पक्षकार्यालयाला भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षप्रवेश देखील शरद पवार यांच्या हजेरीत पार पडला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यालयाचे उदघाटन चांगलेच वादात सापडले होते. मागील शनिवारी १९ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उदघाटन झाले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जवळपास हजारो कार्यकर्त्यांनी उपथिती लावली होती. एकाबाजूला अजित पवार हे जनतेला कठोर नियम पाळण्याच आवाहन करत असले तरी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी नियमांना बगल दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
यामुळे आज शरद पवार हे या कार्यालयात येत असल्याने ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सुबोध मोहिते यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांनी बोलताना या वादावर उपरोधिक भाष्य केलं आणि एकच हशा पिकला. ‘इथे येण्यापूर्वी मी थोडा काळजीत होतो. या कार्यालयाच्या सुव्यवस्थेची बातमी मी दिवसभर बघत होतो. म्हणून निघण्यापूर्वी थोडी चौकशी केली, जाण्यासाठी अनुकूल माहिती आल्यानेच येता आलं,’ असं शरद पवार म्हणाले. तसंच, ही जागा महापालिकेजवळ आहे. शहराच्या मध्यभागी आहे आणि मला खात्री आहे, हे कार्यालय सर्वसामान्य पुणेकरांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपयोगी पडेल, असं देखील शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
