Share

‘कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल’ ; भारतीय संघ अंतिम सामना जिंकणार गांगुलींचा विश्वास

Published On: 

इंग्लंड : क्रिकेट विश्वात जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेलाची उत्सुकता लागली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. डब्ल्युटीसी अंतिम सामन्यासाठी काही तसाच राहिले आहे.  भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी १५ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यापैकी कोणते ११ खेळाडू रणांगणात उतरणार ? नक्की काय रणनीती असणार ? किती गोलंदाज असतील ? किती फलंदाज असतील ? किती फिरकीपटू असतील ? असे सवाल उपस्थित झाले होते.

मात्र स्पर्धेच्या एक दिवस आधी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघ हा अंतिम सामना जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

सामन्यापूर्वी सौरव गांगूली म्हणाले, ‘विराट कोहलीचा भारतीय संघ संतुलित असून या संघात मॅचविनर आणि अनुभवी खेळाडूंची भरणा आहे. भारताला सरावाची फारशी संधी मिळालेली नसली तरी अंतिम सामन्यात कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल याची मला खात्री आहे. आम्हा सर्वांसाठीच हा खूप मोठा क्षण आहे. मी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!