मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान २९ मे रोजी बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये होणार असल्याची घोषणा केली. मात्र याच बैठकीत आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एक महिन्याचा अवधी वाढवून द्यावा अशी मागणी आयसीसीकडे केली.
याच मुद्यावर आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आयसीसीची आज १ जुन रोजी महत्वाची बैठक होणार आहे. दुबई येथे ही बैठक पार पडणार आहे. आयसीसीच्या नियोजीत कार्यक्रमानुसार टी-२० विश्वचषक स्पर्धेच आयोजन हे भारतात होणार आहे. भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने मागीतलेली मुदत आयसीसी मान्य करेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच ही स्पर्धा भारतात होते का इतर कुठे हाही मुद्दा या बैठकीत चर्चीला जाईल.
जर विश्वचषक स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याचे ठरले तर यजमानपद कुणाकडे राहते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. विश्वचषक स्पर्धेदरम्यान ४५ सामने खेळवीले जाणार आहे. एका सामन्यासाठी २ कोटी याप्रमाणे ९० कोटी रुपये बीसीसीआयला मिळतील. मात्र २०१६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान टॅक्समध्ये सवलत दिली नसल्याने बीसीसीआयचा निधी आयसीसीने रोखला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच फडणविसांनी घेतली भेट; राष्ट्रवादीची सारवासारव
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ची 7 वर्षे दलित मागासवर्गीयांच्या हिताची – आठवले
- अभिनेत्रीच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून शिवम पाटीलने केली पोलिसात तक्रार
- चोवीस तासात 40 किमी रस्त्याच्या कामाचा विक्रम; अशोक चव्हाणांनी केले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
- मोठी बातमी : ‘या’ बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

