पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारताच्या पराभवामुळे मालिकेचा अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे. अखेरच्या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्याच्या खिशात मालिका जाईल.
मात्र या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार कोहली पुन्हा एकदा भडकलेला दिसला. दुसऱ्या डावातील २६व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडुवर इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्सने फटका मारुन या चेंडुवर दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. हा चेंडु कुलदीप यादवने क्षेत्ररक्षण करत स्टोक्सच्या दिशेने धावबाद करण्यासाठी थ्रो केला. कुलदीपने केलेला थ्रो थेट यष्टींना लागला. मात्र यावर कोणत्याही भारतीय खेळाडूंनी अपील केले नाही.
पण मैदानावरील पंचानी तिसऱ्या पंचाकडे धाव घेतली असता चेंडु यष्टीना लागुन बेल्स उडाल्या होत्या त्यावेळी स्टोक्सची बॅट ही लाइनवर होती. नियमानुसार स्टोक्स बाद होता. मात्र तिसऱ्या पंचानी त्याला नाबाद ठरवले आणि कोहलीचा पारा चढला. यांनतर कोहलीने मैदानातील पंचाना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पंचानी कोहलीकडे दुर्लक्ष केले. यानंतर कोहली चांगलाच भडकला होता. मात्र निर्णय बदलला न गेल्यामुळे कोहलीच्या हाती काहीच लागले नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- …म्हणून पांड्याला बॉलिंग नाकारली कोहलीने सांगितले कारण
- ‘आणखी किती फेकाल मोदी जी, मराठीत एक लाईन आहे… हद झाली राव’
- अवैध दारू विक्री निदर्शनास आणून द्या, एक वर्ष करापासून मुक्ती मिळावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

