मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आज सकाळी पुणे येथे दिली होती.
शरद पवारांच्या या प्रतिक्रियेवर आता भाजपने समाचार घेतला आहे. ‘जाणते पवार म्हणतायत अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे. अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का?’ असा सवाल भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अबब ! मास्कविना बँकेमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकावर सुरक्षारक्षकाने केला गोळीबार
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

