लखनऊ : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोन नियम पाळण्यासाठी अनेक लोक जनजागृती करत आहेत. दरम्यान उत्तरप्रदेश मध्ये एका घटनेने खळबळ उडाली आहे. मास्कविना बॅंकेत प्रवेश करण्याची कृती एका ग्राहकाला भलतीच महागात पडली. संतापलेल्या सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात तो ग्राहक गंभीर जखमी झाला.
उत्तरप्रदेशच्या बरेलीमधील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत कुठल्याशा कामासाठी राजेश कुमार (वय 35) हे ग्राहक दाखल झाले. त्यांनी मास्क परिधान केला नसल्याने बॅंकेचे सुरक्षारक्षक केशवप्रसाद मिश्रा याने त्यांना रोखले. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मिश्राकडे दुर्लक्ष करत कुमार यांनी बॅंकेत प्रवेश केला. त्यामुळे संतापलेल्या मिश्राने गोळीबार केला. त्यामध्ये जखमी झालेल्या कुमार यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅंकेच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे.कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात किमान 50 लाख जणांना संसर्ग होण्याची अटकळ राज्याच्या आरोग्य खात्याने बांधली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियम पाळणे अतिशय गरजेचे बनले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींचे आरक्षण जाण्याला केंद्रच जबाबदार ; जंतरमंतरवरून मोदी सरकारला जाब विचारणार’ – कॉंग्रेस
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’


