Share

मोठी बातमी : भारतीय संघाची घोषणा, ‘हे’ ११ शिलेदार बनवणार भारताला जगज्जेता

Published On: 

नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये पोहोचले आहे.

डब्ल्युटीसी अंतिम सामन्यासाठी एक दिवसापेक्षा कमी कालावधी राहिला आहे.  भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी १५ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यापैकी कोणते ११ खेळाडू रणांगणात उतरणार ? नक्की काय रणनीती असणार ? किती गोलंदाज असतील ? किती फलंदाज असतील ? किती फिरकीपटू असतील ? असे सवाल निर्माण झाले होते.

अखेर काही वेळापूर्वीच जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

कोण आहेत हे ११ शिलेदार ?

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे अंतिम सामन्यात खेळणार असून भारतासह जगाचं लक्ष या सामन्याकडं लागलं आहे. क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता शिगेला गेली असून हे ११ शिलेदार भारताला पहिली-वहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीपची ट्रॉफी मिळवून देवो याच सदिच्छा !

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!