🕒 1 min read
इंग्लंड : नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. या सामन्यानतंर भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये सुटीचा आनंद घेत आहे. येत्या १४ जुलै रोजी भारतीय संघाचे सदस्य हे बायोबबलमध्ये प्रवेश करणार आहेत.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल देखील लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या सुट्टीमध्ये तो आथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी सोबत वेळ घालवत असल्याचे दिसून आले आहे. राहुलनं शनिवारी अहानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अथियाने देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. जो फोटो अथियाने शेअर केला होता त्या तो फोटो लंडन मधला असल्याचे समजले होते त्यामुळे अथिया देखील केएल राहुल सोबत लंडनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
https://www.instagram.com/p/CRJy3l3grCu/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री आथिया शेट्टी आणि केएल राहुल हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. मात्र त्यांनी अजूनपर्यंत रिलेशनशिपबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
राहुलनं अहान शेट्टीसोबतचा शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील जोरदार कमेंट्स दिल्या आहेत. या फोटोवरून राहुल चांगलाच ट्रोल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
