Share

KL Rahul : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी केएल राहुल करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतीनंतर संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ टी-२० मालिकेच्या संघात निवड झाली आहे. पण, तो फिटनेस चाचणी पास झाल्यावरच सामने खेळू शकेल. ही परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. केएल राहुलचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो मैदानावर कसून सराव करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये केएल राहुल वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. त्याच्या तयारीकडे पाहून असे वाटते की तो आता संघात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. जर राहुल फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला तर तो २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या ५ टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. त्याच्याशिवाय कुलदीप यादवही फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वेस्ट इंडिजला जाणार आहे.

राहुल आयपीएल २०२२ पासून संघाबाहेर

के एल राहुल आयपीएल २०२२ पासून संघाबाहेर आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० सामन्याच्या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. यानंतर इंग्लंड दौऱ्यावरही राहुलला जागा दिली नाही. त्याच्यावर नुकतीच जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तो त्याचे पुनर्वसन पूर्ण करत आहे. राहुलचा याअगोदर एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी नेटमध्ये त्याला गोलंदाजी करताना दिसली. जर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त मैदानावर परतला तर त्याला ऑगस्टमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

https://www.instagram.com/reel/CgOzdRFA0rH/?igshid=YmMyMTA2M2Y=

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात कॅरेबियन संघासोबत ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

भारत vs वेस्टइंडीज वनडे वेळापत्रक

२२ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै- पोर्ट-ऑफ-स्पेन
२७ जुलै – पोर्ट-ऑफ स्पेन

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!