दिल्ली : 18 जुलै रोजी देशभरात राष्ट्रपती पदाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सध्या या निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात झालेल्या या लढतीत मुर्मू यांचे पारडे जड आहे. याच पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्वीच द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावात जल्लोषाचे वातावरण आहे. या गावातील लोक मिरवणूक काढणार आहेत. तसेच त्यांच्या गावात २० हजार लाडू बनवले आहेत.
मतदानानंतर सर्व राज्यातून मतपेट्या दिल्लीत आणण्यात आल्या गेल्या. सध्या संसद भवनातील ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी सुरू असून दुपारी ४ वाजताच्या सुमारास निकाल अपेक्षित आहे. मुर्मू यांच्या विजयानंतर दिल्ली भाजपने पक्ष मुख्यालयापासून राजपथपर्यंत रोड शोचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुर्मू यांच्या राहत्या घरी सुद्धा जल्लोषाची तयारी सुरु आहे.
दिल्ली: राष्ट्रपति चुनाव के नतीजे आज घोषित होंगे। एनडीए की राष्ट्रपति पद की उम्मीदवार द्रौपदी मुर्मू के निवास पर तैयारियां की जा रही है। pic.twitter.com/zxWi7516lC
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2022
देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. हे पाहता नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा 25 जुलै रोजी होणार आहे. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. या निवडणूकीत 34 पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे, तर 44 पक्षांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Atul Bhatkhalkar : “साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला…”, अतुल भातखळकरांनी NCP ला डिवचले
- Uddhav Thackeray : “मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात…”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Eknath Shinde : “पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढा”, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ‘त्या’ प्रकरणी नऊ दिवसांची ईडी कोठडी
- Sanjay Raut : “…डर के माध्यम से शोषण किया जाता है”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत


