🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ चा थरार स्टाईलने सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जडेजा सोबत फलंदाजीस उतरलेल्या धोनीने संघाला १३१ पर्यंत नेण्यास मदत केली. फलंदाजीत सरासरी कामगिरी केल्यानंतर त्यांना गोलंदाजीतही प्रभाव पाडता आला नाही. ज्यामुळे कोलकाता संघाने चेन्नईला ६ विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवलेला रवींद्र जडेजा (CSK captain Jadeja) याने पराभवाचे कारण स्पष्ट केले.
जडेजाने दव आणि नाणेफेक ही दोन्ही महत्त्वाची कारणे सांगितली. तो सामना संपल्यानंतर म्हणाला, “या मोसमात दव हा महत्त्वाचा भाग असणार आहे. नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कराल. पहिल्या ६ -७ षटकांमध्ये विकेटवर थोडा ओलावा होता पण जसजसा डाव पुढे सरकत गेला तसतसे दव आपले काम दाखवू लागले. सामना शेवटपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न होता. दव बघून सगळ्यांनी चांगली गोलंदाजी केली.”
तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (KKR captain Shreyas Iyer) म्हणाला, “जेव्हा एमएस धोनी समोर फलंदाजी करत असतो तेव्हा गोलंदाजांसाठी नेहमीच तणाव असतो. मला वाटले विकेट सपाट असेल. चेंडू पकडणे अवघड होते पण गोलंदाजी लाइनअपमुळे माझ्यासाठी ते सोपे होते. उमेशने नेट्समध्ये खूप मेहनत घेतली असून सराव सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. आज त्याची अशी कामगिरी पाहून खूप आनंद झाला. ही अशी जागा आहे जिथे मला खेळायला आवडते. मी इथेच मोठा झालो.”
दरम्यान चेन्नईने (CSK) दिलेल्या १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून (KKR) सलामीवीर रहाणेने (Ajinkya rahane) ४४ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टॉसवेळी श्रेयस तो संघात आहे हेही विसरला होता. रहाणेनंतर नितीश राणाने चांगली खेळी केली. चेन्नईने दिलेल्या कमी धावांचे लक्ष्य आरामात पूर्ण केले. गेल्या वर्षी उपविजेते ठरलेल्या कोलकाताने चेन्नईला परास्त करत विजयाने आयपीएलची सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आज मुंबईशी भिडणार दिल्ली कॅपिटल्स; विराटचा ‘तो’ विक्रम रोहित मोडणार का?
केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी सुरु- अमोल मिटकरी
पुण्यात तुमची चॉईस काय असेल?; गडकरींनी मिश्कीलपणे म्हटले…
“पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे खेळ खल्लास”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
“भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
