मुंबई: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ आज (२७ मार्च) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडणार आहे. त्यांच्यातील हा पहिलाच सामना असणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गेल्या मोसमात खराब नेट रनरेटमुळे मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.मात्र गेल्या दोन हंगामात पाहिले तर ऋषभ पंतच्या संघावर रोहितच्या मुंबई इंडियन्सची छाप आहे. त्यामुळे आज या दोन्ही संघांत चुरशीची लढत होणार आहे.
दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विरत कोहलीचा विक्रम मोडू शकतो. दिल्लीविरुद्ध विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यापासून रोहित केवळ ४५ धावा दूर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराटने दिल्लीविरुद्ध ९१३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध ८६९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज रोहित शर्माकडे हा विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी असणार आहे.
रोहित शर्मा करू शकतो ‘हा’ वैयक्तिक विक्रम-
रोहित शर्मा आयपीएलमध्ये ९०० चौकार पूर्ण करण्यापासून फक्त ९ चौकार दूर आहे. जर त्याने आणखी ९ चौकार मारले तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा पाचवा फलंदाज ठरेल. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबईकडून खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला ८ षटकारांची गरज आहे. रोहित जर हा विक्रम करण्यात यशस्वी ठरला तर तो मुंबईसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.
महत्वाच्या बातम्या:
“भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा
“मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं”, संजय राऊतांचा हल्लाबोल
चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत
IPL 2022 : सामन्यात पहिला नो बॉल टाकलेला उमेश यादव ठरला १५व्या हंगामातील पहिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’
IPL 2022 : नाईट रायडर्सने पूर्ण केला गेल्या वर्षीचा बदला, चेन्नईला पहिल्याच सामन्यात केले परास्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

