🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केली आहे. तर काल (२६ मार्च) लोकसभेत बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या, असे वक्तव्य केले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की,‘काय झालंय ठाकरे सरकारच्या धुरीणांना. सर्वज्ञानी संजय राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार आणि ताई तर म्हणतात मला फाशी द्या. पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे ‘खेळ खल्लास’ ही भावना एकुणच बळावलेली दिसते’, असे त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, ‘आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या. तसेच जर आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. परंतु ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करणे चुकीचे आहे.आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? न्याय करा’, असे सुप्रिया सुळे काल लोकसभेत म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत
- “मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा
- IPL 2022: १५व्या हंगामातील पहिला टॉस श्रेयसने जिंकला; वाचा दोन्ही संघात कोण खेळणार!
- पुणे सुपरजायंट्सच्या माजी कोचचा धोनीबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाला होता “मला सल्ले…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
