🕒 1 min read
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या कोकणात गेले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी सुरु असल्याचेही मिटकरी म्हणाले आहेत.
यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘केंद्र सरकारने गोरगरिबांच्या जिवनावश्यक वस्तू डिझेल ,पेट्रोल व गॅस आज पासून प्रचंड प्रमाणात वाढवल्या त्यामुळे अस्वस्थ झालेल्या किरीट सोमय्यांना कोकणात जाऊन राजकारण करायला संधी मिळाली. तात्पर्य केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी’, असे मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, काल (२६ मार्च) दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असून जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. हा हातोडा साडेबारा कोटी जनतेचा आहे, असे सोमय्या म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन हे अनधिकृत रिसॉर्ट आहे असे सांगावे, असे आव्हानही सोमय्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत
- “मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा
- “पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे खेळ खल्लास”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- पुण्यात तुमची चॉईस काय असेल?; गडकरींनी मिश्कीलपणे म्हटले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
