Share

मुख्यमंत्री बदलल्यानंतर जागेची मालकी बदलते का? महापौरांचा भाजपला थेट सवाल

Published On: 

मुंबई : मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारनं आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.

कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा. कारशेड उभारणीवरुन केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत तातडीने हस्तक्षेप करीत ‘एमएमआरडीए’ने सुरू केलेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगावे, असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या 11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.आता केंद्र सरकारने दिलेल्या या पत्रानंतर आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. तसेच केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, काम थांबविण्याचे पत्र मिळाल्यानंतर आता राजकारणाला आणि आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली अआहे. ‘मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित असलेली कांजूरमधील जागा ही राज्य सरकारची आहे, असं प्रतिज्ञापत्र यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आलं आहे. आता केंद्र सरकार त्यावर हक्क सांगत असेल तर मुख्यमंत्री बदलल्यानंतर जागेची मालकी बदलते असं समजायचं का?,’ असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.महाराष्ट्राला कोंडीतच पकडायचं असं जर ठरवलं असेल तर अशी अडवणूक होतच राहणार. ‘आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था महाराष्ट्राची करण्याचं षडयंत्र रचलं जातंय असं दिसत असल्याचा आरोपही महापौर पेडणेकर यांनी केला.

दरम्यान, आता राज्यात मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला टीका करण्याची संधी मिळाली असून ‘महाराष्ट्रातील करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींची उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’ असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. ‘राज्यातील 4 हजार कोटींची बरबादी ही करदात्या महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची बरबादी आहे. ज्या ठिकाणी आरेत हे कारशेड बनणार होतं, त्या ठिकाणी झाडं नाही. रोपट्याचं पान तोडण्याचीही आवश्यकता नाही. पूर्णपणे क्रिकेट, फुटबॉल खेळू शकतो एवढं मोठं मैदान तयार झालं आहे,’ असा दावा राम कदम यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!