मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती 12′ हा रिअॅलिटी शो सध्या वादात सापडला आहे. या शोमध्ये अमिताभ यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे.
करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी सोनी टी.व्ही.आणि अमिताभ बच्चन यांच्यावर अंबाजोगाई,बीड या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार यांनी तक्रार दाखल केली आहे बिग बी शिवाय केबीसी 12 च्या मेकर्सविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, या आधी लखनौमध्येही याप्रकरणी अमिताभ व केबीसी 12 च्या मेकर्सविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली होती.
मनुस्मृतीबद्दल या शोमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात जातीय मतभेद निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले होते.
यापूवीर्ही, केबीसी 11मध्ये काही प्रश्नांवरून आक्षेप नोंदविण्यात आला होता. तेव्हा वाहिनीने यावर माफी मागितली होती.“धर्म म्हटलं की भारतात अनेक धर्म आहेत. त्यामुळे पर्यायांमध्ये चारही धर्म आले पाहिजे होते. परंतु विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. बाकीच्या धर्मांच्या ग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही?” असा सवाल अभिमन्यू पवार माध्यमांशी बोलताना विचारला.
बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी हे ३० ऑक्टोंबर रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात आले असता.त्यांना अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला की’ २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बाबसाहेब आंबेडकर और उनके अनुयायीयोंने किस धर्मग्रंथ ग्रंथ की प्रतिमा जलायी थी ? याला पर्याय म्हणून १) विष्णुपुराण २) भगवद्गीता३) ऋग्वेद४) मनुस्मृति हे देण्यात आले होते.सदर प्रश्नांमुळे हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मीय बांधवांवर मानसिक आघात झाला असल्याचे देखील अभिमन्यू पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने होतेय भरघोस वाढ
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

