मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. राज्यपाल ठाकरे सरकारच्या नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? तसेच राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना तात्काळ मंजुरी देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावे ठरल्याची माहिती दिली आहे. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत.
तर, आघाडीतील तिन्ही पक्षात नाराजी पसरत आहे. वारंवार डावलण्यात आल्याची सल मनात धरून काही नेते पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज आहेत. काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप हंडोरेंनी केला. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे.
नाशिकमध्ये काल झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात आहे. आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष देखील आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर, राज्यपाल नियुक्त जागांसाठी विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता देखील धूसर झाल्यानंतर त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लुटारू आणि लबाड सरकार बदलण्याचा मानस यावेळी बिहारमधील जनतेचा आहे’
- ‘या’ काँग्रेसशासित राज्यात फटाके फोडण्यास बंदी
- खडसेंची आमदारकी धोक्यात? राज्यपाल नियुक्त जागेसाठी खडसेंच्या नावावरून वाद !
- शिल्पा शेट्टी बनवणार टिकटॉकला टक्कर देणारे नवे ऍप
- ‘सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
