Share

जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ: काही दिवसांपूर्वी प्रेषितांचे कार्टून दाखवल्यानंतर फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली हाेती. त्यानंतर फ्रान्समध्ये व्यापक निदर्शने करण्यात आली होती. शिक्षकाची हत्या हा दहशतवादी हल्ला असल्याचे वक्तव्य मॅक्राॅन यांनी केले हाेते. त्याचबराेबर त्यांनी इस्लामिक कट्टरवादी संघटनांवर कडक कारवाईचीदेखील घाेषणा केली हाेती. या प्रकरणात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या विरुद्ध मुस्लिम राष्ट्र एकत्र आले आहेत.

या घटनेवर भारतातून देखील प्रतिक्रिया उमटल्या असून उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे तसेच फ्रान्सच्या घटनेवर सत्य बोलण्याची मला जी शिक्षा मिळेल ती मान्य असल्याचे ते म्हणाले.

मी अन्य लोकांप्रमाणे नाही जे आपल्या वरील खटला मागे घेण्यासाठी खरे बोलण्यास घाबरतात जर माझ्या वक्तव्यावरुन काही गुन्हा सिद्ध झाला तर मला चौकात उभा करून गोळ्या घाला असे राणा म्हणाले मला हवं तर जिहादी मला पण मी सत्य बोलण सोडणार नाही. हवा तर मला फाशी द्या पण मी माफी मागणार नाही . असे ते म्हणाले.

आक्षेपार्ह व्यंगचित्र हे पैगंबर मोहम्मद आणि इस्लाम ला बदनाम करण्याच्या हेतूने केले जातात अशा कृत्यामुळे लोक फ्रान्समधील घटनेप्रमाणे पावले उचलतात यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. राफेल करारामुळे मोदी असे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला मोदीनी फ्रान्समधील दहशतवादी घटनेचा निषेध करून पीडित कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!