Share

Rupali Patil | “…त्यांनाच मंत्रिपदं देताना लाज वाटली नाही का?”; रुपाली पाटील संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही ही अपक्ष आमदाराचा समावेश नाही. तसेच या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांवर भाजपनेच आरोप केले होते आणि आता त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटत आहेत. त्यावरुनच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.

“ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी बेकायदेशीर सरकारने शपथ घेतली, हि गोष्ट जनतेला रुचलेली नाही. माझ्यामते हि महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी नोंद आहे. आज शपथविधी झालेल्या निम्म्या मंत्र्यांवर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण आता त्यांना स्वतःकडे घेऊन, गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले. त्यांनाच आता मंत्रिपद देताना यांना थोडीतरी लाज वाटली आहे का? याच अर्थ भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन संविधानाची, लोकशाहीची पायमल्ली करून, जनतेचे लक्ष विचलित करून सत्तेची पोळी भाजत आहेत.”, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली. परंतु टीका करत असताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळालं. भाजप “किरीट सोमय्यांना भुंकायला लावतं”, असं त्या यावेळी म्हणाल्या.

बाळासाहेब थोरातांनीही साधला निशाणा
सरकार स्थापनेनंतर एक दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यांच्यातील खात्याचे वाद संपले असतील अशी अपेक्षा आहे. नवे मंत्रिमंडळ कायदेशीर की बेकायदेशीर ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल पण तूर्तास नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा! पण या सगळ्यात एक खटकणारी गोष्ट आहे, ती म्हणजे हे सरकार महिलांच्याबाबतीत संवेदनशील आहे कि नाही?, हा प्रश्न पडतो. मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान नाही. त्या उलट महिलेवर अत्याचाराचे आरोप असलेल्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. त्यांना सन्मानाचं स्थान देण्यात आले, हे कुणालाही आवडण्यासारखं नाही, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!