🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दक्षिण मुंबईतील राजभवनात 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 18 मंत्र्यांपैकी 9 मंत्री भाजप आणि शिंदे गटाचे आहेत. ज्यामध्ये एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. शपथ घेताच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 20 झाली आहे, जी कमाल 43 सदस्यांच्या निम्मीही नाही. दरम्यान, शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये एक नाव चांगलच चर्चेत आहे. ते नाव आहे मंगलप्रभात लोढा यांचे, मंगलप्रभात लोढा का चर्चेत आहेत. हे जाणून घेऊया.
शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या चार मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगलप्रभात लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठे नाव आहे. ते मुंबई भाजपचे अध्यक्षही आहेत. देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचे नाव आहे.
44 हजार 270 कोटी रुपयांची संपत्ती-
मंगलप्रभात लोढा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 70 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. लोढा यांच्याकडे 44 हजार 270 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मंगलप्रभात लोढा, 66, मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मूळचा राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी असलेला मंगलप्रभात मारवाडी समाजाचा मुख्य चेहरा मानला जातो. 1995 पासून ते सलग 6 वेळा आमदार राहिले असले तरी त्यांना कधीही मंत्रीपद मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | माविआच्या काळात राठोडांवर टीका करणारे पोपट आता कुठं गेले?; पेडणेकरांचा खोचक टोला
- Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!
- Balasaheb Thorat | “हे सरकार महिलांबाबतीत संवेदनशील आहे की नाही?”; बाळासाहेब थोरातांचा सवाल
- Kishori Pednekar । “पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकर संतप्त
- MNS on Sanjay Rathod | “मंत्रिमंडळातील ‘संजय’ सरकारचे जहाज बुडवेल” ; मनसेची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

