Share

‘हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही, पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या’

Published On: 

अमरावती : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. किरीट सोमय्यांनी या दौऱ्यावरुन राज्यातील आघाडी सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी किरीट सोमय्यांनी अमरावती हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारावरून सोमय्यांनी आघाडी सरकारवर शरसंधान साधलं आहे.

अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले होते. त्यावेळी पोलिसांना तात्काळ सूचना गेल्या. हे होऊ द्या, असं पोलिसांना सांगितलं गेलं, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

12 तारखेला हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही. पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या. आघाडी सरकार 12 तारखेचा हिशोब का देत नाही? हे सरकार 12 तारखेचं त्याचं विस्मरण करत आहे. त्या दिवशी तीन ठिकाणी मिरवणुका निघाल्या. या मिरवणुका यांच्या आशीर्वादने निघाल्या होत्या का? याची चौकशी झाली पाहिजे. कुठे मशीद पेटवण्यात आली? त्रिपुरात का? कुणी अफवा फैलावली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या घटनेचा शोध का घेत नाही?, असे सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी केला आहे.

मला अमरावतीत यायचं होतं. पण मला थांबवण्यात आलं. हे अजीबोगरीब सरकार आहे. यांचे मंत्री घोटाळे करतात. मी घोटाळे उघड केले तर जिल्हाबंदी होते. नगरमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. मला तिकडेही जाण्यास बंदी करण्यात आली होती, असा संताप यावेळी किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!