🕒 1 min read
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. (MSRTC Strike) गत चार दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी पगार वाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले असून कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेकांवर निलंबनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आता राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भाष्य केले आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की,’मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीवरील ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचंच आहे. जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त १२ हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही.’ तसेच आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटीचे दोनशे कर्मचारी अद्यापही आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी(२९ नोव्हें.) २५४ जणांची सेवा समाप्ती केली असून आतापर्यंत सेवासमाप्ती केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या १७७९ झाली आहे, तर १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई असून एकूण ७५८५ जणांना निलंबित केले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल; १०० प्रवाशांच्या होणार पुन्हा चाचण्या
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…तरी आझाद मैदान सोडणार नाही’, एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
