ठाणे: ठाणे शहरातील करोनाची (Corona) लाट कमी झाली असली तरी नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सोमवारी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात सतर्कतेच्या दृष्टीने नियोजन करण्यात देखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात झालेली गैरसोय आणि त्यातून मिळालेल्या शहानपणामुळे आता या नव्या विषणूला टक्कर देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये सापडलेल्या करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार ठाणे महापालिकेकडून अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान या भागातून ठाण्यात आलेल्या सात नागरिकांची यादी महापालिकेस देण्यात आली आहे. महापालिकेकडून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर तपासणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिली आहे.
राज्य शासनाकडून येणाऱ्या निर्देशानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून जिल्ह्यातील परदेशातून येणाऱ्या नागरिकांशी महापालिकांच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. अशा नागरिकांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे, त्यांची तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह असल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यामुळे विषाणू आणखी पासरण्याच्या आधीच त्यावर नियंत्रण मिळवता यावं या दृष्टीने ठाणे महापालिकेने कामास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’
- सारा अली खानने बॉडीगार्डला सुनावले; कारण वाचून कराल कौतुक
- खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरात विरोधकांची निदर्शने
- नितेश राणेंनी ठाकरेंना पाठवले पत्र; म्हणाले, फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचे श्रेय….
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

