Share

किरीट सोमय्या सहकुटुंब पोलिसांकडे घेणार धाव, राऊतांविरुध्द करणार तक्रार दाखल!

Published On: 

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या होत आहेत. दोघांमध्ये शाब्दिक वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढतच आहेत. हा वाद आता आणखी जास्त पेटण्याची शक्यता आहे. आपण संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. याबाबतचं सोमय्यांनी फेसबूक पोस्ट केलं आहे.

किरीट सोमय्यांबरोबर यावेळी त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या आणि मुलगा नील सोमय्या देखील असणार आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सोमय्या म्हणतात, “उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड पूर्व पोलिस स्टेशनला संजय राउत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्या साठी मेधा, नील आणि मी जाणार आहोत.” असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

यानंतर किरीट सोमय्या आणि शिवसेना, संजय राऊत यांच्यातील संघर्ष आणखी विकोपाला जाण्याची दाट शक्यता आहे. उद्या मुलुंड पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजप – शिवसेना संघर्ष होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. यापुढे आता काय होईल हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!