Share

किरीट सोमय्यांनी उगाच राजकीय नौटंकी करू नये- अनिल परब

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : मालेगाव येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी परिवहनमंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. किरीट सोमय्यांनी उगाच राजकीय नौटंकी करू नये, असेही परब म्हणाले.

यावेळी बोलत असतांना अनिल परब म्हणाले की,‘सोमय्यांनी भ्रष्टाचारप्रकरणी आलेल्या माहितीची अगोदर शहानिशा करून आरोप केले पाहिजेत आणि खरेच त्यांना भ्रष्टाचार उघड करायचे असतील तर त्यांनी इतर लोकांच्या भ्रष्टाचारावर देखील बोलेल पाहिजे. हा माझा, हा त्याचा असे करून राजकीय नौटंकी करू नये. तसेच पुढे सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलतांना परब म्हणाले की, सोमय्या यांना कोणतीही शारीरिक मारहाण शिवसैनिकांनी केलेली नाही. ते स्वत: पायरीवरून पडले असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. तपासात सत्य समोर येईलच. कोणत्याही घटनेचे राजकारण करू नये, असे परब म्हणाले.

दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना किरीट सोमय्यायांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तसेच यासंदर्भात सोमय्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून ५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचा हेतू पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा, “मोठा दगड” आणि.., असे सोमय्या म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!