मुंबई: काल (६ फेब्रुवारी) लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कात संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) मुंबईत आले होते. यावेळी चर्चेचा विषय ठरला तो, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दिशेने येत आहेत, हे पाहून शरद पवारांच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तटकन उठले अन् सोबतच शरद पवारही उठले. त्यांनी यावेळी काहीच चर्चा केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार(NCP President Sharad Pawar) यांनी हात जोडून मोदींना नमस्कार केला.
मात्र मुख्यमंत्री ठाकरे , शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची देहबोली याचेही अनेक अर्थ, तर्क वितर्क काढले जात आहेत. शरद पवार हे एका हातानं उद्धव ठाकरे यांना काहीतरी खुणावताना व्हिडीओमध्ये दिसले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार,(Deputy Chief Minister Ajit Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी हात जोडून मोदींची औपचारीक भेट घेतली.
महत्वाच्या बातम्या:
- “लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
- बापलेकीचं आपुलकीचं नातं… सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट
- पाकिस्तानच्या पंतप्रधानांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
- विराट कोहलीने रचला नवीन इतिहास ..
- गडकिल्ले फिरत असताना अजून एका ट्रेकरचा मृत्यू..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

