Share

किरीट सोमय्या यांचा ‘या’ शिवसेना नगरसेवकावर मनी लाँड्रींगचा आरोप

Published On: 

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अनेक नेत्यांवर त्याच सोबत मंत्र्यांवर घोटळ्याप्रकरणी आरोप करत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे आपण बघत आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी औरंगाबादचा दौरा केला होता, यावेळी त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक शिवसेना नगरसेवकावर मनी लाँड्रींगचा (Money Laundering) आरोप केला आहे. शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. यशवंत जाधव यांचे कोट्यावधी रुपये त्यांनी कशा प्रकारे मनी लाँड्रींग केले आणि त्यानानंतर त्यांनी कशा प्रकारे बाहेर पाठवले याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्याच सोबत त्याचा पाठपुरावा देखील करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप करतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर देखील आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने यशवंत जाधव यांनी मनी लाँड्रींग केले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे या संदर्भातली चौकशीला गती देण्याचे काम करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!