मुंबई : भाजप नेत्यांना राजकीय बाळकडू कमी पडले आहेत. किरीट सोमय्या भरसटलेले आहे, हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना कळलं तिसरी लाट आलेली आहे. पंतप्रधानांना कळतंय, पण भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कळत नाही, अशी टोलेबाजी पेडणेकर यांनी केली.
किरीट सोमय्या शनिवारी म्हणाले, मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढण्याचा दावा केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. याचा अर्थ ९८ टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसेच ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यातील ९९.९९ टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. या आरोपाला महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, इतके मोठे नेते मात्र, अद्वातद्वा बोलतात. बोलताना त्यांचा कॉन्फिडन्स नव्हता. आता समोर मीडियाचा बूम आहे, तर बोला अशा पद्धतीने भाजपचे वरिष्ठ नेते बोलत आहेत. कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण हे घरात पकडून आणून दाखवले नाहीत. त्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना कळलं तिसरी लाट आलेली आहे. पंतप्रधानांना कळतंय, पण भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कळत नाही, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
- पुढील चार दिवस महराठवाडा, विदर्भात गारपीटीसह पावसाचा इशारा
- वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला “त्यांना शेवटचे…”
- मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

