🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या रोखठोक सदरातून गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. यात त्यांनी भाजप नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासह तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे.
राऊत लिहीतात, गोव्यात निवडणुकांचे वातावरण आहे. आता तृणमूलच्या खांद्यावर बसून भाजपला गोवा पुन्हा जिंकायचे आहे. तृणमूल काँग्रेस व आपसारखे पक्ष गोव्यात येऊन पैशाचा वारेमाप वापर करतात. गोव्याची संस्कृती आणि पर्यावरण आधीच बिघडले. त्यात पेशांचा पाऊस सुरू झाल्याने सगळेच बिघडले.
नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यावर गोव्यात उतरलो, पण गोवा त्याच आनंदाच्या उत्साहाच्या लाटेवर उसळताना दिसले. संपूर्ण देश जणू गोव्यात अवतरला होता सर्व बंधने झुगारुन कोरोना ओमायक्रॉन व्हायरसचा विचार न करता गोव्यात आनंदाधी लाट उसळली. नव वर्षाचा जल्लोष संपला तरी त्या लाटेचे हेलकावे जाणवत होते. गोव्यात आता निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विमानतळावरील खास कक्षात नितीन गडकरीची भेट झाली. मला वाटले मोदी मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम हा मंत्री शासकीय कामासाठी गोव्यात उतरला, पण तेसुद्धा राजकीय कारणासाठीच आलेले दिसले. गडकरी म्हणाले, ‘गोव्यात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय’. गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्यांची केंद्रीय मंत्र्यांची रांग लागली आहे.
मनोहर पर्रीकरांसह भाजप निवडणुकांना सामोरे जात आहे; पण कोणत्या मुद्द्यांवर भाजप निवडणुका लढणार? गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात भाजपची सत्ता आहे. भाजपला येथे बहुमत कधीच मिळाले नाही. निवडणुका संपल्यावर इतर आमदारांना सरळ विकत घ्यायचे व बहुमत करायचे हे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या वेळीही भाजपास बहुमत मिळणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे लोक जागोजागी भेटले. तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धणी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटले.
महत्वाच्या बातम्या
- आशिष शेलार पाठोपाठ आता कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी
- ‘एक भीड का हिस्सा बनता, दुसरा भीड से भागता’; यशोमती ठाकूर यांची पंतप्रधानांवर टीका
- गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला “त्यांना शेवटचे…”
- मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
