🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज (मंगळवार) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ येणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार व पादाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान या सर्व आरोपांना संजय राऊत आज उत्तर देत आहेत.
यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली. “ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने (किरीट सोमय्या) केला आहे. त्याला माझं आव्हान आहे. आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी चाव्या देतो. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन”,असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
“पीएमसी बॅंकेचे तपास ईडी करत आहे. मी किरीट सोमय्याच्या भ्रष्टाचाराचे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. गेल्या तीन महिन्यात किमान तिनवेळा ईडी कार्यालयात पाठवले आहेत. तुम्ही एक गुंठे, दोन गुंठे वाल्यांना बोलावता. मी बघितले आहे, हा किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयामध्ये बसून रोज दही आणि खिचडी खातो, त्याच्या बापाचं राज्य आहे का. ईडीचे सर्व लोक वसूली एजेंट बनले आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मोहित कंबोज भाजपचा फ्रंटमॅन, फडणवीसांना बुडवणार”, संजय राऊतांचा मोठा दावा
- ‘खदखद परिषदेत स्वतःचाच ‘घाम’ निघाला!’; संजय राऊतांवर महापौर मोहोळ यांचा टोला
- “कोणाच्या भरवश्यावर तुम्ही तारखा देताय?”, चंद्रकांत पाटलांना राऊतांचा सवाल
- PMC बँक घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा – संजय राऊत
- महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर; संजय राऊतांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
