मुंबई: भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोपांवर आरोप सुरूच आहेत. एक झालं की दुसरं प्रकरण शोधून काढून महाविकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फायरी सुरूच आहेत. अशातच आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आरोप करताना म्हणाले, ठाकरे सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे २.५ एकर जमीन ९०० कोटीत अल्पेश अजमेरा बिल्डरकडून विकत घेतली, असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान प्रत्यक्षात ही जमीन पूर्णपणे अतिक्रमणची असल्याने ती खरेदी न करण्याचा निर्णय बीएमसीने (BMC) घेतला होता.
महापालिका आयुक्त अजोय मेहता, प्रवीण परदेशी ह्यांनी ही विरोध नोंदविला होता. मात्र तरी देखील ठाकरे सरकारने दहिसरची ही जमीन विकत घेतली. मुंबई महापालिकेने ३४९ कोटी रुपये दिले आहेत. उरलेले पैसे द्यायचे आहे. ह्याला म्हणतात ‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’ असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हा माणूस मला नेहमीच डँबीस वाटायचा; शरद पोंक्षेंचा ब्राह्मण महासंघाच्या ‘त्या’ व्यक्तीवर आरोप
- ‘अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असेल’
- ‘तेव्हा माझे चेंडू ईडन पार्कच्या बाहेर पाठवले होते’, एजाज पटेल, वीरेंद्र सेहवागचे ट्विट चर्चेत
- बॉलीवूडमध्ये तब्बल २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्शद वारसी म्हणाला.. ‘मला धक्का बसला..’
- मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

