Share

साडेतीन लोकांना अटक करा किंवा कोणालाही अटक करा ; परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरे आधी द्या :- किरीट सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता सर्वश्रुतच आहे. संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरात जम्बो कोविड रुग्णालयात घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात बरेच आरोप प्रत्यारोप झाले. त्यातच आज शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मी मंगळवारी म्हणजेच उद्या १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यात भाजप नेत्यांची पोल खोल करणार आहे असा इशारा दिला आहे.

इतकंच नाही तर भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या जागी कोठडीत जाणार आणि देशमुख बाहेर येणार असा थेट इशाराच राऊतांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या धमकीबद्दल किरीट सोमय्या यांना विचारले असता, ” भाजपच्या साडे तीन लोकांना अटक किंवा साडे तीनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या” अशी घाणाघाती प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत आणि शिवसेना माझ्या आरोपांना उत्तर न देता विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे शहरात कोविड जम्बो रुग्णालयात घोटाळा केल्याच्या आरोपाला संजय राऊत उत्तर न देता, ”मी उद्या पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या साडे तीन लोकांना आत टाकणार आहेत असे विधान करत आहेत. मात्र ज्या कंपनीला  काळ्या यादीत टाकले आहे त्या सुजीत पाटकर यांचा लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस  कंपनीलाच कोविड सेंटरची कंत्राटे कशी देण्यात आली याची उत्तर देताना संजय राऊत दिसत नाहीयेत असेही किरीट सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पुणे शहरातील जम्बो कोविड रुग्णालयासंदर्भात प्रश्न विचारणारे ट्विट पण आज किरीट सोमय्या यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!