Share

‘नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं’; फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडवला. या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत कॉंग्रेसवर चांगलीच टोलेबाजी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करतील. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात जोडून आभारही मानले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!