रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे तर हात धुवून संजय राऊत यांच्या मागे लागले आहेत. किरीट सोमय्या यांनी पुणे येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Center) भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गेले महिनाभर शाब्दिक कलगीतुरा चालू आहे. संजय राऊत यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांना पुण्यातील शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. ही धक्काबुक्की झाल्यापासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात वाद आणखीन वाढला आहे.
आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मंगळवारी शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आमदार खासदार सर्वच उपस्थित असणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या खुलाश्या नंतर किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक झाले आहेत.
याबद्दल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले कि, ” शिवसेना उद्या पत्रकार परिषद घेणार आहे त्यानंतर आपली भूमीका मांडणार आहे, जर मी गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन असं सोमय्या यांनी म्हटल आहे, ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या म्हणाले की, विषय डायवट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जातेय.जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून साडेतीन लोकांची नाटकं. तसेच आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावीत असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं’; फडणवीसांचा टोला
- ”हे” असणार एअर इंडियाचे नवीन सीइओ
- कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टीका
- फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
- शिवजयंती बाबत मुख्यमंत्र्यांचे नवीन निर्देश


