🕒 1 min read
मुंबई : काहीच महिन्यांपूर्वी एअर इंडिया भारत सरकारकडून ‘टाटा ग्रुप’ कडे हस्तांतरीत झाली. एअर इंडिया ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी होय. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापन झालेली एअर इंडिया १९५३ मध्ये भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली. १९५२ मध्ये एअर इंडियावर भारत सरकारच प्रभुत्व निर्माण झालं. मात्र गेली अनेक वर्ष एअर इंडिया आर्थिक संकटाचा सामना करत होत. २०२१च्या जानेवारी महिन्यात एअर इंडिया पुन्हा ‘टाटा ग्रुप’ कडे आलं.
मागच्याच महिन्यात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी एन.चंद्रशेखरन यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा पण दिल्या होत्या. तर दिल्ली विमानतळ प्रशासनाने टर्मिनल-३ पूर्णतः ” टाटा ग्रुप” ला वापरायला दिल आहे. याच एअर इंडियाला आता नवीन सीइओ मिळाला आहे. इल्कर आयसी (Ilker Ayci) यांची एअर इंडियाच्या सीईओ (CEO) आणि एमडी (MD) पदी निवड झाली आहे. आज एअर इंडियाच्या बोर्डाने बोलावलेल्या बैठकीत इल्कर आयसी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी बैठकीस टाटा ग्रुपचे प्रमुख एन.चंद्रशेखरन ए देखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
इल्कर आयसी हे याआधी तुर्किश एअर लाईन्सचे अध्यक्ष होते. त्यांना याआधी पण एक मोठी विमान कंपनी हाताळण्याचा अनुभव असून ते एअर इंडियाचे कामकाज पण उत्तम रित्या हाताळतील यात काहीच शंका नाही असे म्हणत एन.चंद्रशेखरन यांनी इल्कर आयसी यांना शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत. याप्रकरणी एअर इंडियाने ट्विट केले असून इल्कर आयसी यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. टाटा सन्सच्या माहितीनुसार इल्कर आयसी हे १ एप्रिल २०२२ च्या आधी एअर इंडियाचा कार्यभार हातात घेतील.
महत्वाच्या बातम्या :
- कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टीका
- ‘कोणाच्या घराबाहेर आंदोलन करणं…’ नवाब मलिकांचे सूचक विधान
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एजीबी घोटाळ्यावरून काँग्रेसवर निशाणा, म्हणाल्या…
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका”; एकनाथ खडसेंची टीका
- ‘स्टंटबाजी करून विकासाची खोटी स्वप्ने दाखवतात’; शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
