मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर काँग्रेसकडून माघार घेण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कॉंग्रेसला उद्देशहून एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे कोणत्याही राजयकी पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारणे योग्य होणार नाही. प्रत्येक पक्षाने याबाबत विचार करावा, अशी आमची भूमिका आहे. @nawabmalikncp
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 14, 2022
नवाब मलिक यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
- भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड; हे आहे कारण
- आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमधे राडा
- शिवजयंती बाबत मुख्यमंत्र्यांचे नवीन निर्देश
- आदित्य ठाकरेंनी पाळला शब्द; ‘निर्णय’ घेताच ग्रामस्थांनी वाजवल्या टाळ्या


