पुणे : नेट फ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षीत मनी हाईस्टचा वेब सिरीजचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. हि वेब सिरीज पाहण्यासठी अनेकजणउत्सुक होते. अखेर मनी हाईस्टचा पाचवा भाग रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा देखील याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सध्या या सिरीज मधील ‘बेला चाओ’ या गाण्याच्याचाल घेऊन ‘खास रे टीव्ही’ या युट्युब चॅनेलने ‘लस घ्या’ हे जनजागृती खास गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाण प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
या गाण्याच्या चालीवर तयार केलेलं गाणं आपल्याला कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करत आहे. या गाण्याचे बोल असे की, “तिसऱ्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या.. लस घ्या…” असं या गाण्याची सुरुवात होते. २.30 मिनिटांच्या या गाण्यामध्ये लस घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.
या व्हिडीओमध्ये काम केलेल्या कलाकरांनी ‘मनी हाइस्ट’ सिरीजमधील लुक धारण केला आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांनी लाल रंगाचे जम्पसूट घातले आहेत. सोबतच मनी हाइस्टचे प्रसिद्ध मास्कही घातला आहे. हे गाणं विविध लोकेशनवर शूट करण्यात आलेलं आहे हे दिसून येत त्यासोबतच त्यांनी हातामध्ये मिम्स असणारे, घोषणा असणारे बोर्डही पकडलेले दिसत आहेत.
मुळ स्पॅनिश भाषेच बनलेल्या मनी हाईस्ट या शोचे पहिला चार भाग तुफान लोकप्रिय झाले आहेत. या शोमध्ये चोरी करताना वापरलेले मास्कचा ट्रेंड जगभरात पसरला आहे. सर्वस्व गमावलेला प्रोफेसर विविध प्रकारची क्षमता असलेल्या आठ लोकांना एकत्र आणतो आणि मग सुरु होतो थरार असे या कार्यक्रमाचे कथानक आहे. लक्षवेधी चोरीच्या प्रकाराने या शोने जगाला वेड लावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर अजित पवार आणि अनिल परबांविरोधात देखील सीबीआय लागेल’; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ‘वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता…’; चंद्रकांतदादांनी दिलं राऊतांना ‘उदाहरण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
