Share

कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील चिंचोली बु. येथे कृषी विभागातर्फे शेतक-यांना खरीप हंगामपुर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात सोयाबीन बियाणे उगवन क्षमता चाचणी, रासायनिक खतांचा संतुलित वापर तसेच माती परिक्षण आधारित खत व्यवस्थापण, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, युरीया रासायनीक खताचा १० टक्के कमी करणे याबाबत मंगळवारी दि.२५ प्रात्याक्षीक दाखवून कृषि अधिका-यांनी मार्गदर्शन केले.

तालुका कृषि अधिकारी काकासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात चिंचोली येथे मंगळवारी हा प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला. कृषी सहायक रामभाऊ साळुंके यांनी रासायनिक खतांचा वापर कमी कसा करता येईल.

तसेच माती परीक्षण आधारे रासायनिक खताबरोबत शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळींचे खते यांचा वापर करणे व बियाण्यास पेरणीपुर्वी अझिटोबॅक्टर, रायझोबियम पीएसबी यांची बीजप्रक्रीया केल्यास जमीनीतील नत्र स्फुरद पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढता येते, युरीया खत करताना निम कोटेड, झिंक कोटेड युरीया वापरल्यास त्याचा अधिक फायदा होतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे, कृषी सहायक रामभाऊ साळुंखे यांनी दिली. यावेळी कृषि पर्यवेक्षक नामदेव जिंदे, सरपंच मिना विलास मते, कृषि मित्र लक्ष्मण मते, चंद्रनाथ मते यांची उपस्थीत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!