मुंबई : भारताने बुधवारी २६ जानेवारीला ७३वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला. याच निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट रसिकांच्या आवडत्या इतर देशांतील खेळाडूंना पत्र पाठवले. ज्यात न्यूझीलँडचा जॉन्टी रोट्स , वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलं आणि इंग्लंडचा केविन पीटरसन यांचा समावेश होता. नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या पत्राला या सगळ्यांनी उत्तर हि दिले आहे. त्यांच्या या पात्राला उत्तर देत केविन पीटरसनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहली.
नरेंद्र मोदी यांच्या पात्राला उत्तर देत केविन पीटरसनने लिहले ” आदरणीय मोदीजी तुम्ही लिहलेल्या या पत्रात तुम्ही अविश्व्सनीयरित्या ज्या भावना लिहल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. २००३ मध्ये इथे पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येक दौऱ्यात मला तुमच्या देशासोबत प्रेम वाढलेय. भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तुम्ही जे काही करत आहात , त्याचे आभार मानायला तुमची वैयक्तिक रित्या भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ” या शब्दात त्याने इंस्टाग्रामवर मोदींसाठी संदेश लिहला आहे. त्याच्या हिंदीतून दिलेल्या या उत्तराला भारतीय क्रिकेटरसिकांकडून मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहे.

नरेंद्र मोदी यांनी केविन पीटरसनला लिहलेल्या पत्रात त्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या खेळाचीही स्तुती केली होती. ज्यात त्यांनी केपीच्या हिंदी ट्विटचाही उल्लेख केला होता. केविन पीटरसन सध्या लेजंड लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. भारतीय संघाचे सामने असताना तो बऱ्याचदा हिंदीतून ट्विट करत असतो. ज्यामुळे त्याने मोदींच्या इंग्लिश मध्ये लिहलेल्या पत्राला हिंदीतून उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आराखडा तयार करा-अब्दुल सत्तार
- ‘कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता…’; चंद्रकांत पाटलांची टीका
- औरंगाबादचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का? हुजरेगिरीविरोधात भाजप करणार आंदोलन..!
- “माझ्या ब्राचं माप देव घेतोय”; वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी
- “रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवणे रिस्की आहे..”; सबा करीम यांचा दावा


